विशेष प्रतिनिधी, मुंबई
जी/दक्षिण विभागातील केशवराव खाडे मार्ग आणि डॉ. ई. मोझेस मार्गावरील पी. टी.पटेल चौक येथील महालक्ष्मी रेल्वे स्टेशन (Mahalaxmi Railway Station) पुलाचे व आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण आता करण्यात येत आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसराचे रुपडे आता पालटले जाईल.
जी/ दक्षिण विभागातील महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या (Mahalaxmi Railway Station) पुर्वेस ऐतिहासिक पुरातन वारसा असलेले महालक्ष्मी धोबीघाट व पश्चिमेस महालक्ष्मी रेसकोर्स हे मुंबईमधील प्रसिध्द दोन पर्यटन स्थळे आहे. या दोन्ही ठिकाणी ये-जा करण्याकरीता महालक्ष्मी रेल्वे स्थानकाचा वापर होत असतो. ऐतिहासिक पुरातन वारसा असलेले महालक्ष्मी धोबीघाट हे एक मुंबईमधील प्रसिद्ध पर्यटन व प्रेक्षणीय स्थळ असून या ठिकाणी देश-विदेशातून पर्यटक भेट देत असतात. केशवराव खाडे मार्ग आणि डॉ. ई. मोझेस मार्गावरील पी. टी. पटेल चौक येथील महालक्ष्मी रेल्वे स्टेशन पुलाचे व आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण आणि सुधारणा करण्याचे काम जी / दक्षिण विभागामार्फत करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Thane Water Cut : ठाण्यातील काही भागात होणार पाणी कपात)
महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या (Mahalaxmi Railway Station) आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण व सुधारणा केल्याने प्रवाशांना अनुकूल वातावरण तयार होईल तसेच परिसराच्या सौदर्यात भर पडेल या दृष्टीने सौंदर्यीकरण व सुधारणा करण्याकरीता संकल्पना व रेखाचित्र तयार करण्यात आले असून यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
यासाठी मगवलेल्या निविदेत पार्वती इन्फ्राप्रोजेक्ट ही कंपनी पात्र ठरली असून महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे ९ टक्के दराने बोली लावत त्यांनी हे काम मिळवले. त्यामुळे विविध करांसह ९५ लाख रुपयांमध्ये हे काम केले जाणार आहे.
हेही पहा –
रेसकोर्स परिसराचे असेही केले होते सुशोभीकरण
महालक्ष्मी (Mahalaxmi Railway Station) रेसकोर्स आजवर केवळ रेल्वे नजिकच्या पुलावरून पाहता येत होती.परंतु महालक्ष्मी रेल्वे पुलाखालील भागापासून ते सेनापती बापट मार्गाला जोडणाऱ्या राखांगी चौकापर्यंतच्या परिसरातील रेसकोर्सची धोकादायक भिंत तोडून त्याठिकाणी रेलिंग बसवण्यात आले आहेत. हे रेलिंग बसवतानाच येथील पदपथाचीही सुधारणा करण्यात आली आहे. तसेच येथील ५५० मीटरच्या परिसरात सायकल ट्रॅक बसवून महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून ते राखांगी चौक परिसरातील भागांचे नुतनीकरण केले आहे.
Join Our WhatsApp Community