Mahanagar Gas CNG Station : महानगर गॅसने सीएनजीची किंमत किलोमागे २ रुपयांनी वाढवली 

33
Mahanagar Gas CNG Station : महानगर गॅसने सीएनजीची किंमत किलोमागे २ रुपयांनी वाढवली 
Mahanagar Gas CNG Station : महानगर गॅसने सीएनजीची किंमत किलोमागे २ रुपयांनी वाढवली 
  • ऋजुता लुकतुके

महानगर गॅस लिमिटेडने आपल्या सीएनजी गॅसच्या किमती प्रती किलो २ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबरपासून महानगर गॅसच्या सीएनजी स्टेशनमध्ये एक किलो सीएनजीसाठी आता ७७ रुपये मोजावे लागतील. महाराष्ट्र आणि झारखंड मधील मतदान पार पडल्यावर कंपनीने हा दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर गेल इंडियाने महानगर गॅस आणि इंद्रप्रस्थ गॅस या दोन्ही कंपन्यांना सुरू असलेला कम्प्रेस्ड गॅसचा पुरवठा जवळ जवळ २० टक्क्यांनी कमी केला होता. त्यामुळे सीएनजीच्या किमती वाढण्याचा अंदाज होताच. (Mahanagar Gas CNG Station)

देशांतर्गत पुरवठा कमी झाल्यामुळे आता कंपन्यांना परदेशातून येणाऱ्या नैसर्गिक वायूवर अवलंबून रहावं लागणार आहे. आणि त्यामुळे अर्थातच किमती वाढणार आहेत. (Mahanagar Gas CNG Station)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यात लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का!)

महानगर गॅस ही देशातील एक आघाडीची नैसर्गिक वायू वितरण कंपनी आहे. पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून जीवाश्म इंधन विकसित करण्याचा विचार झाला तेव्हा नैसर्गिक वायू जर जास्त दाबाने इंजिनमध्ये सोडला तर त्यावर यंत्र चालू शकतं हा विचार पुढे आला. आणि त्यातून कम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीचा वापर इंधन म्हणून करण्यावर खल सुरू झाला. सुरुवातीचे प्रयोग यशस्वी झाल्यावर स्वस्त आणि जास्त काळ चालणारं इंधन म्हणून अल्पावधीतच सीएनजी लोकप्रिय झालं. खासकरून भारतात जिथे ८० टक्के पेट्रोल आणि डिझेल आयात करावं लागतं, तिथे सीएनजी हा लोकप्रिय पर्याय आहे. (Mahanagar Gas CNG Station)

घरोघरी एलपीजी इंधन पुरवणाऱ्या महानगर गॅसनेही १९९५ मध्ये सीएनजी गॅसचं वितरण सुरू केलं. महानगर गॅस ही सरकारी महारत्न कंपनी आहे. गेल इंडिया ही या कंपनीची प्रमोटर कंपनी आहे. म्हणजेच गेलकडून महानगर गॅसला इंधनाचा पुरवठा होतो. आणि तो वितरित करण्याचं काम कंपनी करते. (Mahanagar Gas CNG Station)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक प्रचारातील मुद्द्यांची निवडणूक आयोगाने घेतली दखल)

इंधन वितरणासाठी खासकरून शहरी भागांमध्ये महानगर गॅसची ३५० पेक्षा जास्त सीएनजी स्टेशन आहेत. यात २,९५० च्या वर डिस्पेन्सिंग पॉइंट आहेत. आणि कंपनीच्या वेबसाईटनुसार, जवळ जवळ १० लाख गाड्यांना महानगर गॅसकडूनच इंधनाचा पुरवठा होतो. त्याचबरोबर ४,००० च्या वर व्यापारी संस्थांनाही नैसर्गिक वायू इंधनाचा पुरवठा महानगर गॅसकडून केला जातो. (Mahanagar Gas CNG Station)

तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी नेमकं कंपनीचं गॅस स्टेशन कुठे आहे हे तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. (Mahanagar Gas CNG Station)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.