PNG & CNG RATE : सीएनजी व पीएनजी झाले स्वस्त, काय आहेत नवे दर?

नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

127
PNG & CNG RATE : सीएनजी व पीएनजी झाले स्वस्त काय आहेत नवे दर
PNG & CNG RATE : सीएनजी व पीएनजी झाले स्वस्त काय आहेत नवे दर

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी मोठा (LPG GAS) झटका देत कमर्शियल गॅसच्या किमतीं मध्ये दरवाढ झाली असतानाच दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मोठा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या (CNG RATE) दरात ३ रुपये प्रतिकिलो इतकी कपात झाली आहे तर पीएनजीच्या दरात २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. (PNG & CNG RATE)

घरगुती वापरामध्ये आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचं प्रमाण वाढावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना सीएनजी ७६ रुपये किलो नुसार मिळेल. तर पीएनजी ४७ रुपयांना मिळणार आहे. वाहनधारक मोठ्या संख्येनं सीएनजीच्या गाड्यांचा वापर करतात. तर, मुंबईत देखील विविध ठिकाणी स्वयंपाकासाठी पीएनजीचा (PNG RATE) वापर केला जातो. त्यामुळं महानगर गॅस लिमिटेडनं घेतलेल्या दर कपातीचा निर्णय मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे. (PNG & CNG RATE)

(हेही वाचा : Narendra Modi : घराणेशाही पक्ष कुटुंबाच्या कल्याणात गुंग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका)

मुंबईत सीएनजीचा वापर करणाऱ्यांची पेट्रोलवरील खर्चाच्या तुलनेत ५० टक्के तर डिझेलवरील खर्चाच्या तुलनेत २० टक्के बचत होत असल्याचं एमजीएलनं म्हटलं. आहे. एमजीएलनं पीएनजीचे दर देखील घरगुती एलपीजीच्या तुलनेतक कमी असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलं आहे. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असल्याचं म्हटलं आहे. महागनगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दर कपातीच्या घेतलेल्या निर्णयाचं मुंबईकरांकडून स्वागत करण्यात आलं आहे. यामुळं सीएनजी आणि पीएनजीच्या वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.