महानगर गॅस कंपनीने रिक्षा चालकांसाठी आयोजित केले मोफत नेत्र तपासणी शिबिर

महानगर गॅस लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या सिटी गॅस वितरण कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने ऑटो रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १२ जानेवारी २०२३ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर महानगर गॅस लिमिटेड यांच्या सीएसआर प्रकल्पाद्वारे – ‘एमजीएल आरोग्य’ द्वारे – शण्मुखानंद फाइन आर्टस व संगीत सभा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.

( हेही वाचा : देशात साखर उत्पादन आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्र अव्वल )

या शिबिराचे आयोजन रीजनल ट्रान्स्पोर्ट ऑफिस , अंधेरी (पश्र्चिम) येथे करण्यात आले होते व त्यात १८८ लाभार्थ्यांनी मोफत नेत्र-तपासणीचा लाभ घेतला. त्यांपैकी, १३ रूग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय ३५ डायलेटेड इव्हॅल्यूएशन, ५ रेटिना इश्यूज आणि एका रुग्णाच्या बाबतीत काचबिंदू (ग्लॉकोमा) चे रोगनिदान करण्यात आले.

या शिबिराचे नियोजन महानगर गॅस लिमिटेड येथील सीएसआर टीमद्वारे करण्यात आले आणि पल्लवी कोटावदे, मुंबई (पश्चिम) च्या डेप्युटी आरटीओ, गुणवंत निकम, सीनियर इन्स्पेक्टर, आरटीओ मुंबई पश्चिम आणि थंपी कुरीयन,जनरल सेक्रेटरी, ऑटोरिक्षा युनियन हे या शिबिरासाठी उपस्थित होते.

एमजीएल आरोग्यचाच एक भाग म्हणून महानगर गॅस लिमिटेड यांनी शण्मुखानंद फाइन आर्टस व संगीत सभा यांच्या सहयोगाने नेत्रशिबिरांचे आयोजन केले आहे ज्यात मुख्यत: ऑटो व टॅक्सी चालक आणि त्यांचे कुटुंबियांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. अंधेरी पश्चिम येथे घेण्यात आलेले नेत्रतपासणी शिबिर हे या उपक्रमातील १० वे शिबिर असून याची सुरूवात फेब्रुवारी २०२२ मध्ये करण्यात आली आणि येत्या काही महिन्यात अशा प्रकारच्या आणखी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

आजपर्यंत, अशा शिबिरांमध्ये १३६५ व्यक्तींनी नेत्र-तपासणीचा लाभ घेतलेला आहे आणि ४०० मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आलेले होते, त्यापैकी २९० व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) बद्दल माहिती:

महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ही भारतातील सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (सीजीडी) च्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे आणि जीएआयएल (इंडिया) लिमिटेड हे या कंपनीचे प्रवर्तक (प्रमोटर) आहेत. एमजीएलकडे मुंबई क्षेत्रात नैसर्गिक गॅसचा पुरवठा करण्याचा २७ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे आणि सध्या ते मुंबई व आसपासच्या क्षेत्रात, तसेच महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात कंप्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चे एकमेव अधिकृत वितरक आहेत. एक ग्राहक व पर्यावरण-स्नेही गॅस कंपनी होण्याचे कंपनीचे ध्येय आहे, जी सुरक्षित, कार्यक्षम व विश्वासार्ह उर्जा पुरवेल, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने पसंती दिलेली आणि त्यांच्या सर्व हितधारकांसाठी मूल्यनिर्मिती करणारी कंपनी असेल. एमजीएल ही एक आयएसओ ९००१:२०१५, आयएसओ १४००१:२०१५ आणि आयएसओ ४५००१:२०१८ प्रमाणित संस्था आहे.

आज, एमजीएल जवळजवळ २०.५ लाख घरांना आणि ४००० पेक्षाही जास्त छोट्या व्यापारी व औद्योगिक संस्थांना सेवा पुरवत आहे. याशिवाय एमजीएल ९ लाखपेक्षाही जास्त वाहनांना सीएनजी पुरवते, ज्यात मुंबई, ठाणे, मिरा-भायंदर, नवी मुंबई आणि त्यापलिकडील क्षेत्रातील ३.५ लाख रिक्शा आणि ६०,००० पेक्षा जास्त टॅक्सी व ४ लाखांपेक्षा जास्त मोटारींचा समावेश आहे. तसेच एमजीएल २६०० बेस्ट/ टीएमटी/एमएसआरटीसी/ एनएमएमटी बसेसना, २६००० पेक्षाही जास्त एलसीव्ही/ टेंपो/ खाजगी बसेसना आपल्या स्टील, एमडीपीइ पाइपलाइन सिस्टीमद्वारे आणि ३०० सीएनजी फिलिंग स्टेशन्सद्वारे सीएनजीचा पुरवठा करते, ज्यासाठी त्यांची १८०० पेक्षाही जास्त वितरणाची ठिकाणे आहेत.

अधिकृत वेबसाईट : www.mahanagargas.com

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here