Mahanirmiti चे बनावट नियुक्ती पत्र व्हायरल; बेरोजगार तरुण-तरुणींनी सावध रहाण्याचे आवाहन

60
Mahanirmiti चे बनावट नियुक्ती पत्र व्हायरल; बेरोजगार तरुण-तरुणींनी सावध रहाण्याचे आवाहन
Mahanirmiti चे बनावट नियुक्ती पत्र व्हायरल; बेरोजगार तरुण-तरुणींनी सावध रहाण्याचे आवाहन

महानिर्मिती ही राष्ट्रीय तथा राज्य पातळीवर वीज उत्पादन क्षेत्रातील विश्वसनीय आणि नामांकित अशी कंपनी असून मनुष्यबळ भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची रीतसर प्रक्रिया आहे. महानिर्मितीमध्ये थेट नियुक्ती अथवा निवड करण्यात येत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, अस प्रसिद्धीपत्रक प्रसारित करण्यात आले आहे.  (Mahanirmiti )

नुकतेच समाज माध्यमांवर दोन बनावटी/फेक नियुक्ती पत्रे व्हायरल होत आहेत. महानिर्मितीकडून असल्या प्रकारची कुठलीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महानिर्मितीच्या लेटरहेडचा तसेच अधिकारी नाव आणि पदनामाचा हा गैरवापर आहे. हे पूर्णत: गैरकृत्य असून बेरोजगारांची दिशाभूल, भावनेशी खेळण्याचा, आर्थिक शोषण करण्याचा आणि महानिर्मितीची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात लवकरच पोलिसात तक्रार, बातमी आणि जाहिरात देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची महानिर्मितीची भूमिका आहे.

(हेही वाचा – पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य: Pune Porsche car Accident वर Raj Thackeray यांची अमेरिकेतून टीका)

वरील पार्श्वभूमीवर, बेरोजगार तरुण-तरुणींना आवाहन करण्यात येते की, महानिर्मितीमध्ये थेट नोकरी लावून देण्याचे आमिष देणाऱ्या अथवा महानिर्मिती नोकरी संदर्भात कुठलाही गैरप्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या महानिर्मिती कार्यालयास अथवा पोलिसांना कळवावे. बेरोजगार तरुण-तरुणींनी अशाप्रकारच्या समाज विघातक प्रलोभनांपासून दूर राहावे. महानिर्मिती भरती प्रक्रियेसंबंधी महानिर्मितीच्या (www.mahagenco.in) संकेतस्थळावरून वेळोवेळी माहिती घ्यावी आणि वरील गैरप्रकारापासून परावृत्त व्हावे असे आवाहन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) डॉ. धनंजय सावळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महानिर्मिती भरती प्रक्रिया पद्धती कशी असते ?

महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीवर लागण्याकरिता ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ज्यामध्ये वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते सोबतच महानिर्मितीच्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेसंदर्भात संबंधित उमेदवारांना वेळोवेळी कळविण्यात येते. मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर निवडीबाबतची अंतिम यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर देण्यात येते.एकूणच, महानिर्मितीमध्ये नोकरीकरिता पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येते, याची बेरोजगार तरुण-तरुणी तसेच सामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी. (Mahanirmiti )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.