भारतामध्ये चार ठिकाणी कुंभनगरी आहे. त्यातील बनारस, उज्जैन, हरिद्वार या ठिकाणी विश्वविद्यापीठ आहे. मात्र नाशिक (Nashik) कुंभनगरी असूनही या ठिकाणी विश्वविद्यालय अथवा विद्यापीठ नाही. यामुळे त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी २०१२ पासून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांना अनेकदा पत्र लिहून संस्कृत विश्वविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. या मागणीला सामान्य नाशिककरांसह नाशिक (Nashik), त्र्यंबकेश्वर येथील काही आखाड्याच्या संत- महंतांनी पसंती दर्शवली आहे, महंत अनिकेत शास्त्री यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
बनारस येथे विश्वविद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे उज्जैनला संदीपनी विश्वविद्यालय आहे. हरिद्वारला पतंजली योग विद्यापीठ आहे. मात्र नाशिकला (Nashik) संस्कृत विद्यापीठ नाही. नाशिकला खासगी गुरुकुल आहे. त्यामुळे अधिकृत विद्यापीठ झाले तर संस्कृत, साहित्य, व्याकरण, वेद, उपनिषद, मीमांसा, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, वेदपुराण, गीता या विद्यापीठात शिकवले जातील. यासाठी नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल यांना संस्कृत विश्वविद्यालय स्थापन करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली.
नाशिक (Nashik) नगरीत रामायण काळाचे पुरावे आहेत. प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य या भूमीत झाले आहे. आद्य ज्योतिर्लिंग नाशिकला आहे. निवृत्तीनाथ संजीवन समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, शांताबाई दाणी, दादासाहेब गायकवाड, बाबूराव बागूल, वामनदादा कर्डक यांची नाशिक ही भूमी समजली जाते. नाशिकच्या भूमीला पौराणिक वारसा आहे. म्हणून संस्कृत विश्वविद्यालय नाशिकला व्हावे यासाठी नाशिकचे साधू संत महंत यांनी ही चळवळ उभी केली, संस्कृत विश्वविद्यालय नाशिकला (Nashik) झाल्यास नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन क्षेत्राला न्याय मिळणार आहे. नाशिकच्या संस्कृती परंपरेत वाढ होऊन गुन्हेगारी आटोक्यात आणायला मदत होईल, असे महंत अनिकेत शास्त्री म्हणाले.
Join Our WhatsApp Community