दौंड नगरपालिकेने भीमा नदीकाठी उभारलेले पशूवधगृह बंद झाले नाही, तर तीव्र आंदोलन करु, अशा इशारा रामगिरी महाराजांनी (Mahant Ramgiri Maharaj) दिली आहे. रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) हे आहिल्यानगर जिल्ह्यातील सरला बेट येथील सदगुरु गंगागिरी महाराज संस्थानाचे मठाधिपती आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेने २ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी खर्च करून शहरातील खाटीक गल्लीमध्ये उभारलेले पशूवधगृह भुईसपाट करण्याच्या मागणीसाठी ह . भ. प शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर रामगिरी महाराजांनी लोकांना संबोधित केले. त्यावेळी रामगिरी महाराजांनी हे विधान केले.
(हेही वाचा : Thook Jihad : मसूरीत नौशाद आणि हसन अलीचा विकृत ‘थुंक जिहाद’, पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ)
रामगिरी महाराज म्हणाले की, गोवंशहत्या बंदी कायदा असताना ही गोवंशहत्या होत असते. त्यामुळे ही गोहत्या बंद झाली पाहिजे. कारण गोवंशहत्या अशीच सुरु राहिली तर देशी गोवंश उरणार नाही. त्यामुळे गोवंश हत्या बंद झाली पाहिजे, असे रामगिरी महाराजांनी (Mahant Ramgiri Maharaj) ठणकावून सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community