Mahaparinirvan Din 2023 : पुढच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

225
Mahaparinirvan Din 2023 : पुढच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
Mahaparinirvan Din 2023 : पुढच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

या सरकारसाठी सर्वोच्च महत्वाची बाब म्हणजे इंदु मिल स्मारक लवकर पूर्ण करणे आहे.” जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.Mahaparinirvan Din 2023

यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. चैत्यभूमीवर जमलेल्या अनुयायांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ”लाखो अनुयायी चैत्यभुमी येथे आले आहेत. शासन आपल्या सर्वांचं आहे. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी करण्याचं आणि समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे.या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण केली. Mahaparinirvan Din 2023

(हेही वाचा :Navi Mumbai: नवी मुंबईत २ दिवसांत ६ मुले बेपत्ता, पालकांमध्ये भीतीचे वातावरण)

भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं की, ”डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं काम आहे. भारताच्या निर्मितीचे पहिलं पाऊल ठरलं आहे आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मोलाचा वाटा आहे.
मला या गोष्टीचा समाधान आहे, ज्या वर्षी इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी झाली होती, त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंतप्रधान मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली. त्या ठिकाणी भव्य स्मारकाचा निर्माण होत आहे आणि मला अपेक्षा आहे की, आपला पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस त्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे.” त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
पंतप्रधान मोदी यांचे बाबासाहेबांना अभिवादन
सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. आज, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो’, असं पंतप्रधानांनी म्हटलं.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.