Mahaparinirvan Din निमित्त पुस्तक खरेदीसाठी हजारोंची गर्दी

99
Mahaparinirvan Din निमित्त पुस्तक खरेदीसाठी हजारोंची गर्दी
Mahaparinirvan Din निमित्त पुस्तक खरेदीसाठी हजारोंची गर्दी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी लाखो अनुयायी येत असतात. यावर्षी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात इतरही पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर दि.६ डिसेंबरला रात्री उशीरापर्यंत लोकांची गर्दी पुस्तक खरेदीसाठी पहायला मिळाली. (Mahaparinirvan Din)

( हेही वाचा : बिल्डरची मनमानी, Mumbai High Court चे राज्य सरकारला निर्देश; म्हणाले, राहिवाशांचे प्रश्न…        )

दरवर्षीप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) (Barti) पुणे संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानावर ८५% सवलतीच्या दरात डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवाचे पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. महापरिनिर्वाण दिनी ‘बार्टी’च्या पुस्तक स्टॉलचे उद्धाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते अनुयायांना पुस्तकांचा संच भेट देऊन करण्यात आला. (Mahaparinirvan Din)

यावेळी भीम अनुयायांनी बार्टी पुस्तक स्टॉलवरून पुस्तकांची विक्रमी खरेदी केली. अनुयायांनी बार्टीची पुस्तके खरेदी करण्यासाठी दि. ६ डिसेंबर रोजी सकाळपासूनच स्टॉलवर रांग लावली होती. संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे संविधान, उद्देशिका, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड व इतर महापुरुषांच्या पुस्तकांची खरेदी करण्यासाठी अनुयायांची लगबग दिसून आली. विद्यार्थी, महिला आंबेडकरी चळवतील कार्यकर्ते इतिहास संशोधक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली. (Mahaparinirvan Din)

दरम्यान उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे तसेच जीएसटीचे आयुक्त निखिल मेश्राम (Nikhil Meshram) यांच्या हस्ते अनुयायांना भोजन पॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुध्दा पुस्तक स्टॉलला भेट देऊन पुस्तके खरेदी केली.याप्रसंगी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे (Sunil Vare), निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोसले, उमेश सोनवणे, प्रकल्प व्यवस्थापक नसरिन तांबोळी, सुमेध थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी बार्टीच्या विविध योजनांचा लाभ अनुयायांना होण्यासाठी माहिती पुस्तिका विनामूल्य देण्यात आल्या. अनुयायांना बार्टी तर्फे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीच्या टीमने नियोजन केले. गेल्या तीन दिवसांपासून बार्टीचे अधिकारी व कर्मचारी मुंबई उपनगरचे समतादूत मेहनत घेत आहेत. (Mahaparinirvan Din)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.