भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Mahaparinirvan Din) यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे आज मोठ्या संख्येने जनसागर दाखल झाला आहे. अशातच दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भीम आर्मीच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. दादरमध्ये चैत्यभूमी असल्याने नागरिक आणि भीम आर्मीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला द्यावे, अशी मागणी केली आहे. दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी नाव देण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका आणि प्रयत्न केले जातात, मात्र अद्यापही दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आलेले नाही.त्यामुळे या मागणीसाठी बुधवारी, ६ डिसेंबरला दुपारी १२ भीम आर्मीचे संविधानिक मार्गाने आंदोलन केले.
(हेही वाचा – Terrorist Kill : बीएसएफ तळावरील मास्टरमाईंड दहशतवाद्याचा कराचीमध्ये खात्मा)
Join Our WhatsApp Community