महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार, ४ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातून मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या पर्यटक तसेच आंबेडकर अनुयायांना प्रवास करण्यास सोयीचे होणार आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्र पर्यटनात नोकरीची संधी! मिळेल ५० हजारापर्यंत पगार, ‘येथे’ पाठवा तुमचा अर्ज)
मेगाब्लॉक नाही; सोडल्या विशेष गाड्या
तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत तीन स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान धावतील.
विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूरहून येथून ४ डिसेंबर रोजी 23.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक 01264 ही 5 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी 23.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक 01266 ही ५ डिसेंबर रोजी नागपूरहून 15.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल.
या तिन्ही गाड्यांना अकोला व मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर थांबे देण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांना त्याचा फायदा होईल.
Join Our WhatsApp Community