मागच्या काही दिवसांपासून मुंबईत धुक्याची चादर पसरली आहे, ज्यामुळे शहराची (Maharashtra Air Pollution) हवा खराब झाली आहे. या शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये ‘मध्यम’ श्रेणीत गेली. गेल्या सात ते आठ दिवसांपासून सलग हा प्रकार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी-मॅनेज्ड सिस्टम (Maharashtra Air Pollution) ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च नुसार, बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता मुंबईच्या हवेतील पीएम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर१० ची पातळी दिल्लीतील १२२ च्या तुलनेत १४३ होती.
मुंबईचे संरक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोसारख्या विकास प्रकल्पांच्या चालू कामांमुळे शहरात धूळ प्रदूषण होत असल्याचे सांगितले. मात्र आता केवळ मुंबई, पुणे नाही तर संपूर्ण राज्यातल्या (Maharashtra Air Pollution) अनेक शहरांमधील हवा खराब झाली आहे.
(हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर ‘या’ विक्रमाची नोंद)
मागील २४ तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता (Maharashtra Air Pollution) निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट (मध्यम) श्रेणीत गेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले आहे.
मागील २४ तासात राज्यातल्या (Maharashtra Air Pollution) अनेक शहरात प्रदूषक पीएम २.५, पीएम १० च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाल्याचं चित्र आहे. पुण्यात NO2 तर जालन्यात O3 प्रदूषकाची मात्रा वाढली आहे. उल्हासनगर परिसरात हवा गुणवत्ता वाईट श्रेणीत, एक्यूआय २१३ वर तर जळगावात एक्यूआय १९९ वर आहे. पूर्वेकडून येणारे वारे, वाऱ्यांची कमी गती, तापमानात होणारी घट आणि डस्ट लिफ्टींगमुळे हवा गुणवत्ता बिघडली आहे. मुंबई महापालिकेकडून हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झालीय त्यानंतर मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाल्याचं चित्र दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community