Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवारी, आवाहन मात्र तुतारीला मत देण्याचे; नेमके काय घडले ?

124
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवारी, आवाहन मात्र तुतारीला मत देण्याचे; नेमके काय घडले ?
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवारी, आवाहन मात्र तुतारीला मत देण्याचे; नेमके काय घडले ?

बीड (Beed) जिल्ह्यातील नेत्याने स्वतःचे निवडणूकचिन्ह सोडून तुतारीला मत देण्याचे आवाहन जाहीर सभेत केले आहे. विशेष म्हणजे या नेत्याने भाजपमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. असे असूनही त्यांनी जाहीर प्रचारसभेत तुतारीला मत देण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Salman Khan Threat : सलमानला धमकी देणाऱ्या बिष्णोईला कर्नाटकातून अटक)

बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा (Ashti) मतदारसंघात भाजप नेते आणि माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाने त्यांना उमेदवारी डावलून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे भाजपात काम केल्याने निवडणूक प्रचारसभेत त्यांना अपक्ष म्हणून स्वत:चे असलेले चिन्हच लक्षात आले नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांना चक्क तुतारी वाजवण्याचे आवाहन त्यांनी केले. ही बाब व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर लागलीच त्यांनी सरवासारव केली. भीमराव धोंडे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे, तर तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.

सध्या मतदारसंघात त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.