विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांची धावपळ वाढली आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता महायुतीची पहिली उमेदवार यादी मविआनंतरच (MVA) जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(हेही वाचा – Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावर आणखी दोन मेट्रोंना मंजुरी)
राज्यातील विधानसभा निवडणूक स्वतः अमित शाह मॉनिटर करीत असून मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) ज्येष्ठ भाजप नेते शहांच्या वतीने गेल्या 45 दिवसांपासून नागपुरात ठाण मांडून आहेत. प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर भाजपचे मंथन सुरू आहे. विदर्भासह राज्यातील भाजपच्या प्रत्येक जागेचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. यासंदर्भात दिल्लीला भाजप नेत्यांच्या 2 प्रारंभिक बैठकी झाल्या असून या आठवड्यात आणखी एक महत्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
या सोबतच संघ आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समन्वयातून अंतर्गत प्रचाराची वेगळी मोहिम हाती घेण्यात आलीय. यातून लोकसभेत ज्या जागांवर नुकसान झाले तिथे अधिक सजगपणे काम करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. परंतु, महाविकास आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर महायुतीने आपले पत्ते ओपन करावेत असे काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यामुळे ‘मविआ’नंतरच
महायुतीची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सहयोगी पक्षांना देखील सावधपणे उमेदवार जाहीर करावे असा आग्रह धरण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
या वेळची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक खूपच रंजक असणार आहे. वास्तविक, दोन गटात फूट पडल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. उद्धव गटाची शिवसेना आणि शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अंतर्गत निवडणूक लढवणार आहे, तर शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अंतर्गत निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या.
मात्र, हरियाणात निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचा उत्साह पुन्हा उफाळून आला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी सध्या महायुतीकडे 218 जागा आहेत. भाजप (106), शिवसेना (40), राष्ट्रवादी (40), बीव्हीए (3), पीजेपी (2), मनसे (1), आरएसपी (1), पीडब्ल्यूपी (1), जेएसएस (1) आणि अपक्ष (12) . त्याचवेळी महाआघाडी म्हणजेच विरोधी पक्षाकडे 77 जागा आहेत. याशिवाय 4 आमदारांनी कोणत्याही आघाडीला पाठिंबा दिलेला नसून एक जागा रिक्त आहे. (Maharashtra Assembly Election 2024 )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community