Maharashtra Assembly Election : मुंबईत निवडणूक रिंगणात ४२० उमेदवार

164
Maharashtra Assembly Election : मुंबईत निवडणूक रिंगणात ४२० उमेदवार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मागील काही दिवसांपासून उडालेला धुरळा सोमवारी सायंकाळी खाली बसला आणि प्रचाराच्या तोफा थंडावल्या गेल्या. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती २० नोव्हेंबरची. या दिवशी मतदान होणार असून मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात असेल हे २० नोव्हेंबरनंतर आणि २३ तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांचा आमदार बनण्यासाठी तब्बल ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल बाळगण्यास बंदी असून मतदारांनी शक्यतो मतदानाला जाताना मोबाईल नेवू नये असे आवाहन जिल्हा निर्णय अधिकारी डॉ. भूषण गगराणी यांनी केले आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – मतदानाच्या दोन दिवसआधी काँग्रेसने मुसलमानांना चुचकारले; Muslim Reservation चे दाखवले आमिष )

विधानसभा निवडणुकीकरता येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून या मतदानासाठी मुंबईत कशाप्रकारे व्यवस्था तसेच तयारी करण्यात आली आहे याची माहिती जिल्हा निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. अमित सैनी आणि अतिरिक्त निर्णय अधिकारी अभिजित बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Rashmi Shukla प्रकरणातील याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल)

सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रतीक्षालय, रांगा लावल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, रॅम्प मदतीसाठी दिव्यांगमित्र स्वयंसेवक, मैदानाच्या ठिकाणी मंडप, कचरापेटी, पंखे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, मोकळ्या मैदानाच्या ठिकाणी मंडप, दिशादर्शक फलक आणि मेडिकल किट आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेची Congress च्या महिला मंत्र्यानेच केली पोलखोल)

मुंबईत १०,११७ मतदान केंद्र

यावेळी बोलतांना गगराणी यांनी शहरांतील १० विधानसभा मतदारसंघासाठी १०५ उमेदवार आणि २६ विधानसभा मतदारसंघासाठी ३१५ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले. यासर्व मतदानासाठी मुंबईत २,०८५ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये १०, ११७ मतदान केंद्र उभारण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.