- प्रतिनिधी
निवडणुका आल्या की घरोघरी मतदानाच्या स्लीप वाटणारे कार्यकर्ते हे चित्र हमखास दिसायचे. मतदानादिवशी मतदान केंद्राबाहेर टेबल टाकून मतदारांना स्लीप वाटण्याचे प्रकारही सर्रास असायचे. पण, आता माहिती तंत्रमानातील क्रांतीने हे चित्र बदलले आहे. मुळात आता नेतेच निष्ठावान राहिले नसल्याने त्यांना निष्ठावान कार्यकर्ते मिळणेही दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांची उणीव भरून काढण्यासाठी हायटेक प्रचारावर भर दिला जातोय. त्यासाठी इव्हेंट कंपन्यांची मदत घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या हंगामात इव्हेंट कंपन्यांचा धंदा तेजीत आला आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अतुल खोब्रागडे यांना आर्थिक मदत)
निष्ठावंतांची जागा घेतली इव्हेंट कंपन्यांनी
पूर्वी उमेदवारासोबत चुरमुरे-फुटाणे खाऊन काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते असायचे. पण, आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. नेतेच व्यावसायिक राजकारणी झाले आहेत. त्यामुळे त्यांना निष्ठावान कार्यकर्ते मिळत नाहीत. कार्यकर्त्यांसाठी उमेदवाराला मोठा खर्च करावा लागत आहे. या खर्चाच्या तुलनेत इव्हेंट कंपन्या कमी खर्चात काम करण्यास तयार असल्याने उमेदवारांकडून इव्हेंट कंपन्यांवर मोठी जबाबदारी टाकली जात आहे. सर्व्हेपासून प्रचारापर्यंत, भाषणे लिहून देण्यापासून ‘सर्वकाही एकाच छताखाली’ देणाऱ्या कंपन्या बाजारात आल्याने या कंपन्या जोमात आहेत.
राज्यात अनेक उमेदवारांनी इव्हेंट कंपन्यांना कामे दिली आहेत. निवडणूक अर्ज भरण्यापासून ते प्रचाराचे साहित्य मतदान स्लीप घरोघरी पोहोचवण्यापर्यंत सर्व कामे या कंपन्या करून देत आहेत. याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे, प्रचारपत्रके पोहोचविणे, लाउडस्पीकरवरून उमेदवाराचा प्रचार करणे, वाहनांवर स्लाइड बसवून उमेदवाराचा, पक्षाचा प्रचार करणे, पदयात्रा सुरू असतानाच त्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियार अपलोड करणे, उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवणे, मतदारांपर्यंत मतदानाच्या स्लिपा पोहोचविणे आदी कामे इव्हेंट कंपन्यांकडून केली जात आहेत. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Ind vs SA, 2nd T20 : १७ धावांत ५ बळी घेणारा वरुण चक्रवर्ती या विक्रमांचा शिलेदार)
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी
प्रचाराचा व्याप अन मतदानासाठी उरलेले शेवटचे काही दिवस पाहता उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य नाही. अशा परिस्थितीत इव्हेंट कंपन्या उमेदवारासाठी देवदूत ठरल्या आहेत. उमेदवाराचे व्हिडिओ संदेश, प्रचारदौरे, रॅली, सभांमधील भाषणे त्वरित रेकॉर्ड करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया अपलोड करणे आदी कामे या कंपन्या करत आहेत. कार्यकर्त्यांना तेवढा सोशल अवेअरनेस नसल्याने त्यांची जागा इव्हेंट कंपन्यांनी घेतली आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – ‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?)
सोशल मीडियावर प्रचार जोमात
व्हॉट्स अॅप, फेसबुक, एक्स आदी सोशल मीडिया साइटवर उमेदवाराचा हायटेक प्रचार करणे, उमेदवारांच्या प्रचाराची गाणी तयार करणे ही कामे इव्हेंट कंपन्यांकडून केली जात आहेत. यासाठी इव्हेंट कंपन्यांकडून स्वतंत्र वॉररूमची स्थापना करण्यात आली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत उपनगरांतील प्रचार कार्यालयात मतदारांना मतदानाच्या स्लीप वाटण्यात येतात. मतदाराचे मतदान कुठल्या बूथवर, कुठल्या खोलीत आहे हेदेखील स्लीपवर लिहून दिले जाते. (Maharashtra Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community