Maharashtra Assembly Election : मजुरांचे अड्डे ओस; कामासाठी मिळेनात मजूर

79
Maharashtra Assembly Election : मजुरांचे अड्डे ओस; कामासाठी मिळेनात मजूर
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून प्रचार रॅली, सभांसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासत असल्याने हजारो हातांना काम मिळाले आहे. तर मंडप व्यावसायिक, वाहनमालकांनाही ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई आणि विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या नाक्यावरती काम करणारे नाका कामगार देखील आता मिळेनासे झाले आहेत. राज्यातील स्किल आणि अनस्कील कामगार मिळण्याची ठिकाण सध्या ओस पडली आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – ‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?)

दीपावली सण झाल्यानंतर छोटी मोठी काम करण्यासाठी लागणारे मजूर हे नाक्या नाक्यावर उपलब्ध असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून हे मजूर गायब आहेत. निवडणुकीच्या प्रचारामध्ये, रॅलीमध्ये मनुष्यबळ, कार्यकर्त्यांचा संख्याबळ दिसावं यासाठी माणसांची गरज मोठ्या प्रमाणात भासत असते. त्यामुळे उमेदवारांकडून नाक्या नाक्यावर उभे असलेले हे मजूर सकाळ सकाळ बोलून घेतले जातात आणि दिवसभरासाठी प्रचार रॅलीमध्ये वापरले जातात. या कामगारांमध्ये सुतार काम, रंगारी, बिगारी काम करणारे तसेच त्यांच्या हाताखाली काम करणार लोक असतात. परंतु सध्या हे कामगार देखील मिळणे दुरापास्त झाले आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Ind vs SA, 2nd T20 : संजू सॅमसनच्या नावावर एक नकोसा विक्रम; पुन्हा शून्यावर बाद )

यांनाही मिळाला रोजगार

अलीकडच्या काळात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम नसल्याने स्थलांतराची वेळ येत आहे. परंतु, सध्या विधानसभा निवडणुकीमुळे मजुरांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. प्रचार कार्याकरिता मनुष्यबळ लागत असल्याने मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मजुरांचे अड्डे ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.