Maharashtra Assembly Election : उद्योग विभागाच्या आस्थापनांना मतदानाची सुट्टी

67
Maharashtra Assembly Election : उद्योग विभागाच्या आस्थापनांना मतदानाची सुट्टी
  • प्रतिनिधी

येत्या २० नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Bhandara District Assembly : महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक; युतीची मदार वैयक्तिक लाभाच्या योजनांवर)

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – ९ वर्षांच्या मुलींचा निकाह होणार; Iraq मध्ये मुसलमान महिलांच्या लैंगिक शोषणाचा कायदा)

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने दिला आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.