Maharashtra Assembly Session 2024: पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, कामकाज किती दिवस चालणार? 

4275
Assembly Election 2024 : उबाठा शिवसेना, काँग्रेसमध्ये घोळात घोळ; जाहीर केलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की

लोकसभेच्या निवडणुका संपल्या, एनडीएने सरकार स्थापनही केले. दरम्यान, आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. याआधी विधिमंडळाचे पावसाठी अधिवेशन (Monsoon session) होणार आहे. पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहेत. तसेच राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. (Maharashtra Assembly Session 2024)

विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Adv.Rahul Narvekar), विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – Ayodhya : श्रीराम मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी, व्हायरल व्हिडिओमुळे यूपी सरकारकडून अलर्ट जारी)

किती दिवस चालणार कामकाज ? 

पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

(हेही वाचा – MHADA Mumbai Board : म्हाडाच्या मुंबईतील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी येत्या २७ जून रोजी ई-लिलाव)

अधिवेशन विविध मुद्द्यावर गाजणार

या अधिनेशनामध्ये राज्यातील दुष्काळ आणि अन्य विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजणार असल्याची चर्चा आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.