राज्यातील एटीएसने 7 किलो युरेनियमचा मोठा साठा जप्त करण्यात आला, यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या युरेनियमची किंमत सुमारे 21 कोटी 30 लाख इतकी आहे. एटीएसच्या नागपाडा युनिटने ही मोठी कारवाई केली.
या कारवाईत जिगर पांड्या (27) आणि अबू ताहीर (31) या दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेले युरेनियम हे ट्रॉम्बे मधल्या BARCमध्ये तपासणी करण्यात आली. हे युरेनियम हे मानवी जीवनासाठी खूप घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एटीएसने या प्रकरणात ऍटोमिक एनर्जी कायदा (1962) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासला सुरुवात केली आहे.
(हेही वाचा : कंगना एकटीच नाही! ट्विटरची कारवाई हेतुपुरस्सर? )
युरेनियम आले कुठून?
महाराष्ट्र एटीएसने मुंबईत आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. अणुबॉम्ब बनविण्यासाठी लागणारे तब्बल 7 किलो युरेनियम जप्त केले आहे. हे दोघे आरोपी हे युरेनियम खरेदीदाराच्या प्रतिक्षेत होते. तेव्हा एटीएसने सापळा रचून त्यांना पकडले आहे.हे युरेनियम उच्च दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेला जिगर हा युरेनियम विक्रीसाठी नागपाड्याला येणार असल्याची टीप एटीएसला मिळाली होती. यानुसार एटीएसने सापळा रचला व जिगरला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अबु ताहीरने हे युरेनियम दिल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी हे युरेनियम एका खासगी लॅबकडे चाचणीसाठी आणि शुद्धता तपासण्यासाठी दिले होते. आता महाराष्ट्र एटीएस या आरोपींना मदत करणाऱ्या त्या खासगी लॅबची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम कुठून आले? त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? याचाही तपास केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community