‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024’ लवकरच जाहीर होणार; CM Devendra Fadnavis यांची माहिती

28
'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024' लवकरच जाहीर होणार; CM Devendra Fadnavis यांची माहिती
  • प्रतिनिधी

राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी आलेल्या शिफारशींमधील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी मोलाचे योगदान आहे. या पुरस्काराचा अंतिम निर्णय सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानभवन येथे बोलताना सांगितले.

विधानभवनात निवड समितीची बैठक

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पुरस्कार निवडीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, ॲड. उज्ज्वल निकम (दूरदृश्यप्रणालीद्वारे), वासुदेव कामत, गो. ब. देगूलकर आणि डॉ. शशिकला वंजारी उपस्थित होते.

(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार का?; भाजपा गटनेते Pravin Darekar यांचा सरकारला सवाल)

“पुरस्कार निवड ही अत्यंत कठीण प्रक्रिया” – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. शासनाला प्राप्त शिफारसी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यातील एकाची निवड करणे कठीण कार्य आहे. पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.”

पुरस्कार निवड प्रक्रियेवर सादरीकरण

या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेबाबत सादरीकरण केले. तसेच, निवड समितीच्या अशासकीय सदस्यांनी आपापली मते मांडली.

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर केला जाणार असून, संपूर्ण राज्याचे या प्रतिष्ठित पुरस्काराकडे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.