आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन आम्ही धन्य झालो – देवेंद्र फडणवीस

90

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन आम्ही धन्य झालो. अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ ने सन्मानित करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार मांडले.

(हेही वाचा –शिवरायांची वाघनखे आणि जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश उपउच्चायुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

जगात खरे श्रीमंत तुम्ही आहात. इथे जमलेले लोक हे जगातील आठवं आश्चर्य असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. कपडे खराब झाले तर धुता येतात. पण मन स्वच्छ कसं करायचे. आप्पासाहेब हे मन स्वच्छ करण्याचे रसायन आहे. ते महाराष्ट्र भूषण आहेतच. या पुरस्काराच्या माध्यमातून सरकारनं केवळ आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम, वृक्षारोपण यासारखे मोठे काम यांच्या मार्गदर्शनात होत आहे. जवळपास २५ लाख वृक्ष लावण्यात आले. श्री परिवाराच्या वतीने पाच जंगलाचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. तसेच ६४२ टन गाळ काढण्याचे काम यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे. यांच्याकडून कोट्यावधी लोकं प्रेरणा घेऊन सामाजिक काम करत आहेत. तसेच फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.