कोकणातील पूरग्रस्तांसाठी भाजपाचा मदतीचा हात

123

कोरोना संकटामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन व त्यामध्येच कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणवासीयांचे व्यवसाय व जनजीवन ठप्प झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात मूर्तिकारांचे कारखाने पाण्याखाली गेले आहेत. ही संकटमय परिस्थिती ध्यानात घेता कोकणवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपाच्यावतीने उत्तर भारतीय विभागाकडून कोकणातील बहिणींसाठी रक्षाबंधन निमित्त चिपळूण येथील भिले या गावी कपड्यांसह भांडी आणि जीवनावश्यक साहित्यांचे संच असलेली गाडी कोकणासाठी रवाना करण्यात आली. तसेच भाजपाच्या वसई-विरार विभागातर्फे पुरग्रस्तांसाठी गणेशाच्या ३०० मूर्तींचा एक ट्रकही कोकणात रवाना करण्यात आला. कोकणवासीयांना पाठवण्यात आलेल्या या दोन्ही ट्रकना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.

मदतीचा हात

वसई -विरारमधील भाजपा पदाधिका-यांनी मदतीचा हात कोकणवासीयांसाठी पुढे केला आहे. कामगार क्षेत्रात काम करत असताना कोकणवासीयांना मदत दिल्याबद्दल कोकणवासीयांतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. कोरोना संकटाबरोबर कोकणात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे आज सर्व व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक छोट्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे शासनाची बंधने तर दुसरीकडे मागणीच नाही. संकटकाळात कारागिरांवर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे मूर्तिकार मूर्तीही बनवू शकत नाहीत. त्यामुळे आपले आराध्य दैवत गणपतीचा सण कसा साजरा करायचा, अशी विवंचना असताना मंगळवारी ३०० गणपतीच्या मूर्ती भाजपाकडून कोकणात चिपळूण येथे पाठवण्यात आल्या.

काय म्हणाले दरेकर?

कोकणवासीयांना मदतीचा हात देण्यामध्ये उत्तर भारतीय समाजाचाही समावेश आहे. जेव्हा-जेव्हा मुंबईत, महाराष्ट्रात आपत्ती आली, संकटे आली मग ते निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तौक्ते चक्रीवादळ, तेव्हा-तेव्हा या महाराष्ट्रासाठी उत्तर भारतीय समाज अत्यंत ताकदीने उभा राहिला आहे. याच पद्धतीने आजही कोकणवासीयांना मदतीचा हात दिल्याबद्दल व कोकणवासी बांधवांच्या, बहिणींच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.