बारावीचा निकाल ९९.६३ टक्के !

कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.८१ टक्के इतका लागला आहे, तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी ९९.३४ टक्के इतका लागला आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी, ३ ऑगस्ट रोजी जाहीर केला. त्याप्रमाणे यंदाचा १२वीचा निकाल हा ९९.६३ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षी हा निकाल ९६.९३ टक्के इतका लागला होता. यंदाच्या वर्षी बारावीसाठी १३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, तर १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल!

कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.८१ टक्के इतका लागला आहे, तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी ९९.३४ टक्के इतका लागला आहे. यंदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९९.७३ टक्के लागला असून मुले ९९.५४ टक्क्यांनी निकाल लागला आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६ हजार ५४२ आहे. १०७ विषयांचा निकाल लावण्यात आला. त्यातील ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३५ टक्के मिळालेले एकूण १२ विद्यार्थी आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९१ हजार ४२० आहे, ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी १ हजार ३७२ आहे, तर १०० टक्के गुण मिळालेले ४६ विद्यार्थी आहेत.

(हेही वाचा : हुश्श! आज बारावीचा लागणार निकाल!)

गेल्या वर्षीच्या तुलनेत २.५२ टक्के निकाल अधिक

यंदाच्या वर्षी विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के लागला आहे, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के लागला आहे, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा १२वीचा निकाल हा २.५२ टक्क्यांनी अधिक लागला आहे.

निकालाची विभागवार टक्केवारी

  • कोकण : ९९.८१
  • मुंबई : ९९.७९
  • पुणे : ९९.७५
  • कोल्हापूर : ९९.६७
  • लातूर : ९९.६५
  • नागपूर : ९९.६२
  • नाशिक : ९९.६१
  • अमरावती : ९९.३७
  • औरंगाबाद : ९९.३४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here