ठरलंच…दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन! अभ्यासक्रमात कपात…

142

महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

बोर्डाच्या झालेल्या  पत्रकार परिषदेनुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. तसेच कोरोना काळात परीक्षार्थींना काही सवलती देण्यात आल्या आहेत. घोषित केल्या गेलेल्या वेळापत्रकानुसारच, 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून या वर्षी 15 दिवस उशिराच परीक्षांचे वेळापत्रक आखण्यात आल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. या परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत.

दहावीची परीक्षा ही 1 मार्चला होत असते मात्र या वर्षी आपण 15 मार्चलाच घेण्याचं आधीचं ठरवली होते. किमान 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. दहावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा ही 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित केली आहे. बहिस्थ परीक्षक न नेमता त्याच शाळेतील परीक्षक नेमला जाईल. प्रत्येक केंद्रावर एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने योग्य वेळेतचं केली जाईल, असं शरद गोसावी म्हणाले.

(हेही वाचा :‘ते’ कृषी कायदे शेतक-यांच्या हिताचेच होते! अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे मत )

या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे

  • दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे.
  • दिलेल्या वेळापत्रकात काही कारणास्तव जर मुलांना प्रॅक्टीकल परीक्षा देता आल्या नाहीत, तर त्यासाठी त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिल या वेळेत परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार
  • 40-60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटे वाढवून दिली गेली आहेत.
  • तसेच 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे.
  • एका वर्गात 26 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवले जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
  • तसेच तब्येतीच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास त्यांना वेगळ्या कक्षात बसवले जाणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.
  • विद्यार्थ्यांना चांगले वातावरण मिळावं म्हणून त्यांच्याच शाळा वा महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत.
  • ज्या शाळा वा महाविद्यालयांमध्ये 15 पेक्षा कमी विद्यार्थी परीक्षा देणार असतील तेथील मुलांना जवळचे परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे.
  • तसेच परीक्षेच्या वर्गात परीक्षक म्हणून त्याच शाळा वा महाविद्यालयातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.