Maharashtra budget 2023-2024 : शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी

राज्यातील शिवकालीन गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. तसेच काही गड-किल्ले यांची पडझड होत आहे. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे जातं आणि संवर्धन होण्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमींकडून विविध ठिकाणी मोर्चे काढले जात होते. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच आझाद मैदान येथे शिवप्रेमींनी महामोर्चा काढला होता. त्याची दखल घेत गुरुवार, ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिवकालीन गड-किल्ल्यांसाठी ३०० कोटी रुपयांची घोषणा केली.

मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरात शिवचरित्रावरील उद्याने 

राज्याचा अर्थसंकल्प आज राज्यातील विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री फडणवीस यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने स्थापन करण्यात येणार आहे. याकरता २५० कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. तसेच शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ३०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here