सरकार संभाजी महाराजांना विसरले! नामकरणावरून फडणवीसांना काय केली टीका?

98

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने अडीचशे कोटी रुपये दिले, हे चांगलेच झाले आहे. कारण छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्ज्वल्य इतिहास आहे. मात्र औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती, परंतु त्या घोषणेचा विसर या शिवसेनेला पडला आहे. याचे उत्तर या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरात यावे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

शिवरायांच्या स्मारकाचे विस्मरण 

राज्याच्या अर्थसंकल्पवरील चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला. या आघाडी सरकारने मागील वर्षी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी १२ कोटी रुपयांची घोषणा केली होती, परंतु त्यासाठी एक नवा पैसा दिला नाही, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.

(हेही वाचा अर्थसंकल्पातील महसुली तूट फसवी! फडणवीसांनी काय केला आरोप?)

शेतकरी पंचतत्वात विलीन होतोय… 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. जी कामे अर्थसंकल्पात बसत नाहीत त्यांनाही पैसे दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी पैसे दिले नाहीत. वीज मंडळाला आम्ही बाराशे कोटी दिले, पण शेतकऱ्यांची वीज कापू नका, असे सांगितले होते. ५००-७०० रुपये भरले तरी आम्ही शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती, ती घोषणा गेली कुठे? तुमची पंचसूत्री काय कामाची? शेतकरी पंचतत्वात विलीन होण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे १००० कोटी कमी करा आणि ते ऊर्जा विभागाला द्या आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही, असे घोषित करा, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.