देशातील पहिली जीन बॅंक महाराष्ट्रात !

428

राज्य मंत्रिमंडळांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सागरी जैवविविधता, पिकांचे वाण, पशुधनाच्या विविध जाती, गवत, माळरान आणि कुरणांमधील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जनुक कोष ( जीन बॅंक) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. असा कोष निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

प्रकल्पाची होणार अंमलबजावणी

या निर्णयाने राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणा-या पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. वनहक्क क्षेत्रासाठी संरक्षण व व्यवस्थापन योजना, वनपरिसर पुनर्निर्माण या घटकांचाही सदर कोषात समावेश असणार आहे. जैवविविधतेतील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना, त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठीचा हा प्रकल्प असणार आहे. त्यासाठी येत्या पाच वर्षांत 172.39 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्य जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

( हेही वाचा: देशात कोळशाचा अभाव; राजधानी दिल्ली जाणार अंधारात? )

निधीतून सुविधा उभारण्यात येणार

राज्यातील पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणेच शासकीय घरबांधणी अग्रिम योजनेतून अग्रिम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. सध्या खासगी बॅंकांमार्फत असलेल्या या कर्ज योजनेमध्ये व्याजाच्या तफावतीची रक्कम जास्त असल्याने शासनावर आर्थिक भार पडत आहे. ठाणे, रत्नागिरी, बारामती, जालना या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय बैठकीत झाला. विमा कंपन्यांशी झालेल्या सामंजस्य करारानुसार, राज्य आरोग्य हमी सोसायटीस उपलब्ध झालेल्या 272.71 कोटी निधीतून या सुविधा उभारण्यात येतील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.