Maharashtra Cabinet Meeting: सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण होणार 

148
Cabinet Meeting : पूर्णा नदीवर दहा साखळी बंधारे; ५३४ कोटींच्या खर्चाला सरकारची मान्यता

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत (Cabinet Meeting) महायुती सरकारने (Mahayuti Govt) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित होते. (Maharashtra Cabinet Meeting)

दरम्यान, या मंत्री मंडाळाच्या बैठकीत एकूण ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता ही देण्यात आली आहे. 

(हेही वाचा – Solar Energy : रेफ्युजी १ आणि २ गावांतील सौर ऊर्जा प्रकल्प मेजर कौस्तुभ यांना समर्पित)

सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत राज्यातील सहा हजार किमी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते मात्र त्याऐवजी या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित ३६ हजार ९६४ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. (Maharashtra Cabinet Meeting)

(हेही वाचा – बांगलादेशात इस्लामी राजवट आणा; Al Qaeda चे आवाहन)

डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी खर्च अपेक्षित होता. या नव्या निर्णयामुळे सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत शासनाच्या सहभागाची रक्कम २५८९ कोटी इतकी वाढली असून एकूण शासन सहभागाची रक्कम ११ हजार ८९ कोटीस मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (Maharashtra State Infrastructure Development Corporation) सहभागाची रक्कम ५८७५ कोटी इतकी वाढली आहे. हे ६ हजार कि.मी.चे रस्ते महामंडळाला १७.५ वर्षे कालावधीसाठी हस्तांतरीत करण्यात येतील. (Maharashtra Cabinet Meeting)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.