अखेर सीईटीच्या तारखा जाहीर… कधी होणार परीक्षा?

कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती, अखेर मंगळवारी राज्य सरकारने तारखा जाहीर केल्या आहेत.

93

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी ज्या सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते, त्या सीईटी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सीईटी परीक्षा होणार आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पदवी, पदव्युत्तर आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवण्यासाठी सीईटीची परीक्षा घेण्यात येते. कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. अखेर मंगळवारी राज्य सरकारने तारखा जाहीर केल्या आहेत.

ऑनलाईन परीक्षा होणार

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे. सीईटीला एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती, यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

(हेही वाचाः मुंबईतील ‘ही’ रेल्वे स्थानके होणार विमानतळासारखी!)

विद्यार्थी व पालकांमध्ये होता संभ्रम

बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. त्यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला होता. मात्र, सीईटीच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे पुढील काही दिवसांत सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.