Maratha Reservation :कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या करणं ही बाब अत्यंत दु:खद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

195
Maratha Reservation : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
Maratha Reservation : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम येत्या २४ तारखेला संपणार आहे. त्यानंतर त्यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या करणं ही बाब अत्यंत दु:खद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिलं. यामध्ये ‘अनेक कायदेशीर बाबी आहेत, त्या पूर्ण करण्याचं काम सुरु आहे’, त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी थोडा धीर धरावा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. (Maratha Reservation)

मनोज जरांगे यांनी त्यांच्या आजच्या सभेमध्ये त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून आत्महत्येचा घटना देखील समोर येत आहेत. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी दिलेला शब्द पाळणारच.अतिशय संवदेनशील घटना घडतायत. त्यामुळे कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

(हेही वाचा : Lalit patil : ड्रगमाफिया ललित पाटीलचा छडा लावण्यासाठी शिंदे गावात चौकशी, मुंबई पोलिसांचे पथक दाखल)

 सर्वोच्च न्यायालायात मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष घालणार 
जे आर्थिक घटकांमधून आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायायलयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालायामध्ये ते आंदोलन टिकू शकलं नाही. पण आता क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालायाने दाखल करुन घेतली. त्यामध्ये मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटलं. मागील वेळेस ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडता आल्या नाहीत त्या सर्व बाबी यावेळी मांडण्यात येतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.