शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार – मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत जय जवान जय किसान,जय कामगार चा नारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत की, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत.

कोविडच्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक करत पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान असल्याचे  मुख्यंमंत्री यावेळी म्हणालेत.

रश्मी ठाकरेंचीही उपस्थिती

मंत्रालयामध्ये ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते.

 खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले. तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे म्हणत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here