कोरोना रुग्णसंख्येत वाढ! महाराष्ट्रात तब्बल १११५ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

134

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच आता देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्य सरकारसोबत बैठक आयोजित केली होती. राज्यात गेल्या २४ तासात तब्बल १ हजार ११५ कोरोना रुग्ण आढळले असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

( हेही वाचा : उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी? ‘या’ पेयाचा करा आहारात समावेश, जाणून घ्या फायदे)

राज्यात कोरोनाचे ५४२१ सक्रिय रुग्ण असून त्यामधील मुंबईत १५७७, ठाणे ९५३, पुणे ७७६, नागपूर ५४८, रायगड २३७, पालघर १६०, सांगली १६७, सोलापूर १२५, सातारा १२३ तसेच धाराशिवमध्ये १२४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक ते तीन मृत्यूंची नोंद होत होती परंतु बुधवारी त्यात वाढ होऊन ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत २, ठाणे पालिका हद्दीत २, वसई विरार पालिका १, पुणे पालिकेत ३ तसेच अकोल्यात एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद केली गेली. राज्यातील रुग्णसंख्या एक हजारच्या पार गेली आहे. तसेच मृत्यूची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळ, हरियाणा, पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. पुद्दुचेरी प्रशासनाने तात्काळ सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. रुग्णालय, हॉटेल्स, रेस्टॉरंट, दारूची दुकाने, मनोरंजन क्षेत्रे, सरकारी कार्यलयांमध्ये कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे आवश्यक असल्याचे निवदेनातून स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.