तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीदरम्यान थडकणा-या मंदौस या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ वगळता राज्यातील अकरा जिल्ह्यांना मेघगर्जनेसह हलक्या पावसासह 30 ते 40 ताशी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने यलो अलर्ट वर्तवला आहे. मुंबई आणि ठाण्यात सोमवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मंदौस चक्रीवादळ शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी भल्या पहाटे तामिळनाडू किंवा आंध्रप्रदेश किनारपट्टीदरम्यान थडकेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता कमी होत त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात (डिप्रेशन) होईल. शनिवारी 60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. तामिळनाडू किनारपट्टीतील उत्तर तर आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागांत शनिवारपर्यंत अतिवृष्टी होईल. राज्यात चक्रीवादळातील बाष्पामुळे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतील ब-याचशा जिल्ह्यांना रविवारपासून यलो अलर्ट राहील. त्यातुलनेत विदर्भात शुक्रवारपासून सलग चार दिवस हलका पाऊस किंवा शिडकावेच राहतील.
यलो अलर्ट जारी केलेले जिल्हे
दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा तसेच मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद
Join Our WhatsApp Community