दिवेआगरातील गणपती मंदिरात पुन्हा स्थापना झाली सुवर्ण गणेश मूर्ती

रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात ९ वर्षांनी पुन्हा सुवर्ण गणेशाची स्थापना झाली. ९ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून सुवर्णमूर्ती आणि सोने पळवून नेले होते. दरोडेखोरांनी विकलेले सोने पोलिसांनी छडा लावेपर्यंत वितळवले होते. कायद्याच्या कचाट्यात अडकलेले हे सोने राज्य सरकारकडे सोपवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यानंतर मंदिरात पुन्हा सुवर्ण गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने या मंदिरात ९ वर्षांनंतर पुन्हा सुवर्ण गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.

काय आहे प्रकरण? 

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्ण गणपती मंदिरातील सोन्याची मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेला नुकतीच ९ वर्षे झाली. या सुवर्ण गणपती मंदिरातून सोन्याचा मुखवटा चोरीला गेला होता. यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मंदिर चोरी झाल्याने सारेच चकित झाले होते. दरोडेखोरांनी चोरी केलेला गणपतीचा सोन्याचा मुखवटा चोरून विकला. परंतु पोलिसांनी या प्रकणाचा छडा लावेपर्यंत मुखवट्याचे सोने वितळवून झाले होते. यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेत वितळलेले सोन हस्तगत केले होते. मात्र हस्तगत केलेले सोने कायद्याच्या कचाट्यात सापडले. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता ९ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुवर्ण गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण मुखवट्याचे सोने राज्य सरकारकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाला दिले.

(हेही वाचा मंत्री परबांच्या निवासस्थानी का वाढवला पोलिस बंदोबस्त? वाचा…)

५ आरोपींना आजन्म कारावास 

दिवेआगारातील या सुवर्ण गणपती मंदिरात २४ मार्च २०१२ साली चोरीची घटना घडली होती. दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून मंदिरातील सुवर्ण मूर्ती आणि सोने पळवून नेले होते. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दरोडेखोरांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून वितळवलेले 1 किलो 361 ग्रॅम सोने हस्तगत केले होते. या प्रकरणी 5 आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर 2 सोनारांना 9 वर्षे आणि 3 महिलांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here