अभ्यासाला बुट्टी, पुन्हा शाळांना सुट्टी!

143

मुंबईतील शाळांना १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर झाल्याचे परिपत्रकं उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी जारी केली आहेत. शिक्षण भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिलेल्या पत्रानंतर, मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांनी तिन्ही शिक्षण निरीक्षकांना दिवाळी सुट्टीबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. यानुसार शाळांना अखेर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थी पालक संभ्रमात

दिवाळी तोंडावर आली तरी दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नाही, त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते.

(हेही वाचाः सानुग्रह अनुदानाचा महापालिका प्रशासन आणि महापौरांना विसर)

शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरेंचं पत्र

विद्यार्थी व पालकांच्या वतीने शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी २१ ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांना याबाबत पत्र लिहलं होतं. शिक्षण उपसंचालकांनी आज सकाळीच याबाबत उत्तर, पश्चिम, दक्षिण तिन्ही शिक्षण निरीक्षकांना सुट्टीचा कालावधी जाहीर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या व त्यानुसार आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी, पालक एकंदर सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.