शाळा पुन्हा सुरु होणार! केव्हा आणि कशा? वाचा…

एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसवावेत, असे शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीत म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट निवळल्यानंतर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी नियमावली बनवण्यात आली आहे.

या शासन निर्णयात ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील शाळेतील इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. म्हणजेच सकाळ आणि दुपार या दोन सत्रांत शाळा चालवावी, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

(हेही वाचा : मंडळे, महामंडळे बनले पांढरा हत्ती! २० वर्षांपूर्वीचे वार्षिक अहवाल २०२१मध्ये केले सादर!)

या आहेत मार्गदर्शक सूचना!

 • कोरोनासंबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणाने पालन करावे
 • एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसवावेत
 • सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे
 • संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, दररोज दुसऱ्या गावातून शिक्षक येणार असतील, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये
 • शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे, शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे
 • थर्मामीटर, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता करणे
 • शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी
 • एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे
 • स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे
 • क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी
 • संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची चाचणी करावी
 • वर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था सोशल डिस्टंसिंगला धरून असावी

(हेही वाचा : अधिवेशनात ‘राडेबाजी’! भाजपचे 12 आमदार निलंबित… कोण आहेत ‘ते’ आमदार?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here