पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने केली पॅकेजची घोषणा! किती मिळणार मदत?

मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मदत कधी मिळणार, याकडे पूरग्रस्तांचे लक्ष लागून राहिले होते. त्याचसंदर्भात आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देली आहे.

अशी आहे मदत

राज्य सरकारने पूरग्रस्त भागांचे चंचनामे केले असून, त्यानुसार मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये नुकसानग्रस्त दुकानदारांना 50 हजार, तर टपरी धारकांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ज्यांच्या घरांचे जास्त नुकसान झाले आहे, त्यांना दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर ५० टक्के घर नुकसान झालं असल्यास ५० हजार रुपये आणि २५ टक्के नुकसान झालेल्या घरासाठी झालेल्या घरांसाठी किमान १५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

शेती नुकसानाबाबत आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाले आहे. मत्स्य व्यवसाय, एमएसईबी विभागाचं, ग्रामीण विकास या भागांसाठीही मदत केली जाणार आहे. तसेच ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांना म्हाडातर्फे पक्की घरे बांधून मिळणार आहेत.

असे झाले आहे नुकसान

राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू होणार आहे. दुकानं आणि टप-यांची संख्या 16 हजार इतकी असून, खरडून गेलेली शेतजमीन 30 हजार हेक्टर इतकी आहे. तर बागायती, जिरायतीसाठी सविस्तर निर्णय जाहीर करण्यात येतील. ४ हजार ४०० प्राण्यांचा या आपत्तीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यासाठी ६० कोटींची वेगळी रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here