सुट्टी हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांपासून नोकरीवर (Job News) जाणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच सुट्टी कायमच हवीहवीशी वाटते. शाळेच्या पहिल्या दिवशी दैनंदिनीमध्ये किंवा शाळेच्या एखाद्या मासिकामध्ये छापून येणारी सुट्ट्यांची यादी ज्याप्रमाणं पाहिली जाते, अगदी त्याचप्रमाणे आणि त्यात उत्सुकतेनं नोकरदार वर्गही येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याला नेमक्या किती सुट्या मिळणार याचीच प्रतीक्षा करत असतो. राज्य शासनाने पुढील वर्षातील म्हणजे २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील वर्षात विविध धार्मिक व राष्ट्रीय सणांच्या २४ व एक अतिरिक्त सुट्टी अशा एकूण २५ सुट्ट्या जाहीर केल्या असून, त्यात शनिवार व रविवारला जोडून ९ सुट्ट्या आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खूशखबर असल्याचे मानले जात आहे. (Public Holidays)
कधी आणि कोणत्या तारखांना आहेत सुट्ट्या
नवीन वर्षातील पहिलीच प्रजासत्ताक दिनाची २६ जानेवारीची सुट्टी शुक्रवारी आल्याने शनिवारी, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सोमवारी १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुट्टी आहे, त्याआधी शनिवार व रविवार सुट्टी असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. महाशिवरात्री शुक्रवार (८ मार्च), होळी सोमवार ( २५ मार्च ), गुडफ्रायडे शुक्रवार ( २९ मार्च), बकरी ईद सोमवार (१७ जून), ईद ए मिलाद, सोमवार ( १६ सप्टेंबर), दिवाळी अमावास्या (लक्ष्मीपूजन) शुक्रवार (१ नोव्हेंबर ) आणि गुरुनानक जयंती शुक्रवार ( १५ नोव्हेंबर). या सुट्ट्या शनिवार व रविवारला जोडून आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांचा सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे.
(हेही वाचा : Ind vs Aus Final : अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादेत वायूदलाचा एअर शो)
नवीन वर्षातील पाच सुट्ट्या शनिवारी व रविवारी आल्या आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, बकरी ईद, गणेश चतुर्थी, दसरा व दिवाळी बलिप्रतिपदा या सुट्यांचा समावेश आहे. त्यामुळे या स्वंतत्र सुट्ट्यांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. राज्य शासनाने ३ नोव्हेंबरला भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे, परंतु त्या दिवशी रविवार असल्याने ती सुट्टीही स्वतंत्रपणे मिळणार नाही.
Join Our WhatsApp Community