राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. तसेच, नव्या रुग्णांच्या नोंदी कमी आहेत त्यामुळे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कोविड निर्बंध शिथिल केले आहेत.
हे आहेत नवे नियम
- लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन स्थळे, तसेच उद्याने 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येणार आहेत.
- नव्या कोविड नियमांतर्गत 1 फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील.
- स्थानिक परिस्थिती लक्षात घेता, रात्रीच्या संचारबंदीबद्दलचे नियमही शिथिल करण्याचे अधिकार तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- लग्नसमारंभासाठी आता २०० जणांना निमंत्रण देता येणार आहे.
( हेही वाचा: धक्कादायक! अनिल देशमुखांचा उत्पादन शुल्क खात्यातही बदल्यांचा भ्रष्टाचार? कुणी केले आरोप? )
म्हणून घेतला निर्णय
सोमवारी शहरात एक हजाराहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली, तर पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून झपाट्याने कमी झाली. आठ दिवसांपूर्वी 93 हजार 642 वर पोहोचलेली ही संख्या सोमवारी साठ हजारांच्या आत आली आहे. राज्यातील अन्य शहरांमध्येही हेच चित्र आहे. राज्यात कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर, ठाकरे सरकारने 10 जानेवारीपासून निर्बंध जारी केले होते. आता मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट आता उतरणीला लागली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला .
Join Our WhatsApp Community