राज्य सरकारचा नवीन आदेश… ‘या’ दोन राज्यांतून येणा-या प्रवाशांवर असणार नजर

या राज्यांतून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. 

राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी कमी होण्याचे नाव घेत नाही. दररोज साधारणपणे 70 हजारच्या घरात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक दि चेन अंतर्गत घातलेले कडक निर्बंध 15 मे पर्यंत वाढवले आहेत. त्याचबरोबर आता इतर ठिकाणांहून राज्यात होणारा कोविड-१९चा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना राज्य सरकारकडून संवेदनशील आपत्तीचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यांतून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

काय आहे आदेश?

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, खबरदारी म्हणून हा आदेश राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आला आहे. १८ एप्रिल २०२१  रोजी जाहीर केलेल्या आदेशात असलेल्या ठिकाणांशिवाय ही दोन राज्य त्यात सामील करण्यात आली आहेत.

(हेही वाचाः काय आहे ऑक्सिजन काँसंट्रेटर, त्याच कोण, कसा वापर करू शकताे? जाणून घ्या तज्ज्ञांची मते )

प्रवाशांना पाळावे लागणार नियम

या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून तो मागे घेईपर्यंत किंवा कोविड-१९ आपत्ती असेपर्यंत ही दोन्ही राज्य संवेदनशील उत्पत्तीचे ठिकाण म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणांसाठी आतापर्यंत निघालेल्या पत्रकांत यांच्या माध्यमातून ज्या-ज्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर(एस ओ पी) घोषित करण्यात आल्या आहेत, त्या सर्व एस ओ पी या दोन राज्यांहून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here