ब्रेक द चेन : काय बंद, काय सुरु? जाणून घ्या सविस्तर नियमावली!

३० एप्रिल २०२१ पर्यंत ही नियमावली राज्यभर लागू करण्यात येणार आहे.

150

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावावा याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही होते, पण अन्य राजकीय पक्षांच्या दबावापोटी मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले. त्याची घोषणा रविवारी, ४ मार्च रोजी केली आणि रात्री उशिरा त्याची नियमावली जाहीर केली. ३० एप्रिल २०२१ पर्यंत ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे काय आहे ही नियमावली जाणून घेऊया!

रात्री संचारबंदी! 

  • कलम १४४ राज्यभर लागू
  • सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार या वेळेत ५ पेक्षा अधिक लोकांना जमण्यास प्रतिबंध
  • उर्वरित वेळेत रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत (सोमवार ते शुक्रवार) आणि रात्री ८ (शुक्रवारपासून) ते सकाळी ७ (सोमवारपर्यंत) संपूर्ण लॉकडाऊन
  • आरोग्य आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळून

अत्यावश्यक सेवांमध्ये यांचा समावेश!

  • रुग्णालय, तपासणी केंद्रे (डायग्नोस्टिक सेंटर), दवाखाने, वैद्यकीय विमा कंपनी, मेडिकल, औषध निर्मित कंपन्या आणि अन्य आरोग्य सेवा
  • किराणा, भाजी, डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थ दुकाने
  • सार्वजनिक वाहतूक – ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या
  • अन्य देशांशी संबंधित कार्यालये
  • स्थानिक स्वराज्य संस्थांची पावसाळ्यापूर्वी कामे
  • स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व कामे
  • माल वाहतूक, कृषी संबंधी सर्व सेवा, ई – कॉमर्स, अधिस्विकृत पत्रकार
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपत्कालीन प्राधिकरणाच्या सेवा

आऊट डोर सेवा 

  • सर्व समुद्र किनारे, उद्याने, मैदाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ आणि शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत बंद
  • स्थानिक स्वराज्य संस्थांनी या नियमांचे पालन होते का हे पहाणे

दुकाने, मॉल आणि बाजार

  • अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त सर्व दुकाने, बाजार आणि मॉल बंद
  • अत्यावश्यक सेवांची दुकाने सोशल डिस्टन्स ठेवून सुरु ठेवणे
  • दुकानात काम करणाऱ्यांचे लसीकरण अनिवार्य

सार्वजनिक वाहतूक 

  • रिक्षा – चालक+२ प्रवासी
  • टॅक्सी – चालक + २ प्रवासी
  • बस – केवळ आसने, उभ्या प्रवाशांना परवानगी नाही
  • सर्व सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांनी मास्क घालणे अनिवार्य अन्यथा ५०० रु. दंड
  • चारचाकी टॅक्सी – जर प्रवाशांनी मास्क घातला नाही तर चालकाला ५०० रुपये दंड
  • सर्व वाहने निर्जंतुक (सॅनिटाईज) करणे
  • सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्वांचे लसीकरण करावे
  • यातील कुणीतरी RT-PCR चाचणी निगेटिव्ह नसेल आणि लस घेतलेली नसेल तर १ हजार रुपये दंड
  • बाहेर गावी जाणाऱ्या वाहनांमध्येही उभ्या प्रवाशांना परवानगी नाही
  • बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनमध्ये मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड

कार्यालये

  • खालील कार्यालये वगळता सर्व खासगी कार्यालये बंद
  • सहकारी, सार्वजनिक आणि खासगी बँक
  • बीएसई/एनएसई, इलेक्ट्रिक सप्लायसंबंधी कंपन्या
  • दूरसंचार कंपन्या विमा/वैद्यकीय विमा कंपन्या
  • औषधनिर्मिती कंपन्यांची अशी कार्यालये जी उत्पादनाशी संबंधित आहेत
  • स्थानिक स्वराज्य संस्थांची आपत्कालीन व्यवस्था संभाळणारी कार्यालये
  • सरकारी कार्यालये – ५० टक्के उपस्थिती
  • वीज, पाणी, बँक आणि अन्य अर्थक्षेत्राशी संबंधित कार्यालये
  • सरकारी कार्यालये, तसेच सरकारी कंपन्या यांच्या बैठका ऑनलाईन कराव्यात
  • सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यंगतांना प्रवेश निषिद्ध

खासगी वाहतूक 

  • सर्व खासगी वाहने, खासगी बसगाड्या सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहावीत
  • शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने

चित्रपटगृह आणि मनोरंजन क्षेत्र 

  • चित्रपगृहे, नाट्यगृहे, सभागृहे आणि पार्क बंद
  • व्हिडिओ गेम पार्लर बंद, वॉटर पार्क बंद
  • जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुल बंद

चित्रपट, मालिका आणि जाहितींचे चित्रीकरण 

  • चित्रीकरण कमी कामगारांच्या साहाय्याने करावे
  • सर्व कामगारांनी RT-PCR चाचणी करून घ्यावी
  • त्याचा अहवाल १५ दिवसांपर्यंत मान्य असावा
  • जर एखादा कोरोनाबाधित सापडला तर सर्वांना चाचणी अनिवार्य

रेस्टारंट, बार, हॉटेल

  • सर्व रेस्टॉरंट, बार बंद
  • सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ पार्सल व्यवस्था सुरु
  • घरपोच पार्सल व्यवस्था सुरु
  • घरपोच पोहचवणाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे
  • जर लसीकरण केले नसेल तर RT-PCR चाचणी करावी याचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपये दंड

प्रार्थनास्थळे 

  • सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद
  • प्रार्थनास्थळांची देखभाल करणाऱ्यांनी लस घेणे अनिवार्य

केशकर्तनालय/स्पा सेंटर/ब्युटी पार्लर 

केशकर्तनालय, स्पा सेंटर, ब्युटी पार्लर बंद

वृत्तपत्रे

  • वृत्तपत्रे छपाई होऊ शकते
  • सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपोच केले जातील
  • यासंबंधी सर्व घटकांनी RT-PCR चाचणी करावी

शाळा आणि महाविद्यालय

  • शाळा, महाविद्यालये बंद
  • इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात येतील सर्व खाजगी शिकवण्या बंद

धार्मिक/सामाजिक/ राजकीय कार्यक्रम 

धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी

विवाहासाठी ५० जणांची उपस्थिती अनिवार्य त्यात सहभागी घटकांनी RT-PCR चाचणी करावी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.