महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे बंद! मात्र प्रवाशांची रेल्वेकडून लूट

83

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने काही कोरोना निर्बंध लावले, त्यानंतर ते आणखी कडक केले. ह्यात साधारण ५० टक्के क्षमतेने सर्व उद्योग सुरू ठेवले. पण पर्यटनस्थळे पूर्ण बंद करून स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंट, टॅक्सी व अन्य व्यावसायिकांवर पूर्ण उपासमारीची वेळ आणली. पर्यटन स्थळे बंद झाल्यामुळे स्थानिकांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना दुसरीकडे भारतीय रेल्वे सुद्धा रेल्वे प्रवाशांची लूट करत आहे.

प्रवाशांवर भुर्दंड

पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रवाशांनी आधीच रेल्वे तिकिटे आरक्षित केली होती. पण कोरोना नियमावलीनुसार सरकारने पर्यटन स्थळे बंद केल्याने पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांना आता रेल्वे तिकीट रद्द करताना साध्या स्लीपर कोचसाठी प्रत्येकी २४० रु., ३एसी साठी ३६० रु., तर २एसी कोचसाठी ४०० रु. एवढा भुर्दंड भरावा लागणार आहे. रेल्वेचा कारभार बघणारे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी राज्य सरकारने पर्यटन स्थळे बंद करण्याचा आदेश काढला, तरीही यावर रेल्वेने, प्रवाशांना रद्दीकरण शुल्क माफ करण्याचा कुठलाही निर्णय जाहीर केला नाही, याचे आश्चर्य वाटत आहे. संपूर्ण भारतातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

( हेही वाचा : माथेरानकरांना कोरोना निर्बंध नको! काय आहे कारण? )

शासनाचा गोंधळ

हीच परिस्थिती विमान कंपन्यांची आहे. त्यांना सुद्धा महाराष्ट्र शासनाने विशेष सूचना देऊन ह्या महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण परतावा द्यावा म्हणून आदेश द्यायला हवेत, पण तसे काहीही राज्याच्या मुख्य सचिवांनी किंवा पर्यटन खात्याने केल्याचे दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या ह्या गोंधळवर सर्वच प्रवासी नाराज आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.