10वीचा निकाल 15 जुलैपर्यंत, पण 11वीत प्रवेश कसा घ्यायचा? वाचा…

जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

136

राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. 10वीच्या परीक्षेचे मूल्यांकन करुन 15 जुलैपर्यंत निकाल लावण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. पण परीक्षा झाल्या नाहीत तर 11वी साठी महाविद्यालयात प्रवेश कसा मिळवायचा, याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून 11वी प्रवेशासाठी राज्यभर ऐच्छिक सामाईक प्रवेश परीक्षा(सीईटी) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता. ११वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

(हेही वाचाः राज्याचा बारावीचा फॉर्म्युला ‘३०:३०:४०’? ‘त्या’ विद्यार्थ्यांवर होणार अन्याय?)

अशी होणार सीईटी

  • राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांत 11वीला प्रवेश घेणा-या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आंतरराष्ट्रीय मंडळांत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • ही साईटी विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे ऐच्छिक असणार आहे.
  • ही परीक्षा 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात येतील.
  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी(Multiple Choice Question) असतील.
  • 100 गुणांची एक प्रश्नपत्रिका असून, त्यासाठी 2 तासांची वेळ देण्यात आली आहे.
  • ही परीक्षा ऐच्छिक असल्याने 10वीच्या निकालानंतर राज्य मंडळाच्या पोर्टलवर परीक्षेसाठी ऑप्शन देण्यात येईल.
  • राज्य मंडळा(एसएससी)च्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी फी भरली असल्याने, त्यांना या सीईटीसाठी कुठलीही फी भरावी लागणार नाही.
  • सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना मात्र, या परीक्षेसाठी फी भरावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.