कोरोना पॉझिटिव्ह असाल तर आता तुमची रवानगी होणार… जाणून घ्या कुठे ते?

142

कोरोना विषाणूची लोकांमध्ये दहशत आहे. साधा ताप आला इतकंच काय साधी शिंक जरी आली, तरी आपल्याला कोरोना झाला नाही ना, या भीतीनेच अनेकांना घाम फुटतो. कोरोना झाला तर आपले काय होणार, असा प्रश्न भल्याभल्यांना पडलेला आहे. याबाबत आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे दिसत असल्याने, राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात यापुढे कोणालाही होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय, राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे म्हणाले.

काय म्हणाले टोपे

राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असे केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेले रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

(हेही वाचाः कोरोना ‘मेड इन चायना’! जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल! )

या 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद

बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर या 18 जिल्ह्यांतील रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहता येणार नाही. तसेच या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवलं जाणार, असे टोपेंनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.