माझा मानसिक छळ होतोय, रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात याचिका!

राज्यातील पोलिस बदल्या संदर्भात  रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याप्रकरणी मुंबई सायबर गुन्हे विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी चौकशीसाठी शुक्ला यांना समन्स पाठवण्यात आले आहे. 

मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पाठवलेल्या समन्स विरोधात केंद्रात प्रतीनियुक्तीवर गेलेल्या जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स पाठवून आपला मानसिक छळ केला जात असल्याची याचिका शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.
राज्यातील पोलिस बदल्या संदर्भात राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख असतांना रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याप्रकरणी मुंबई सायबर गुन्हे विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या व हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अप्पर पोलिस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांना सायबर गुन्हे विभागाकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते.

याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी!

मात्र रश्मी शुक्ला यांनी कोरोनाचे कारण देऊन आपण मुंबईला चौकशीसाठी राहू शकत नाही, हवे तर तुम्ही मला प्रश्न ई मेल करा मी त्याची उत्तरे पाठवते, असे शुक्ला यांनी म्हटले होते. मात्र चौकशीला हजर रहावे लागणार म्हणून दुसरे समन्स शुक्ला यांना पाठवण्यात आले. समन्स पाठवून महाराष्ट्र सरकारकडून आपला मानसिक छळ होत आहे, अशी याचिका जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिल रोजी हैदराबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्याच्या काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीररीत्या टॅप केले होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी मुंबई सायबर गुन्हे विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात चौकशी करण्यासाठी सायबर गुन्हे शाखेने २८ एप्रिल रोजी चौकशीला हजर रहा, असे समन्स शुक्ला यांना पाठवले होते. मात्र चौकशीला येणे सध्या शक्य नसून घाई असेल तर प्रश्न पाठवा, त्याची उत्तरे देईल, असे शुक्ला यांनी म्हटले होते. दरम्यान २८ एप्रिल रोजी शुक्ला हजर न राहिल्यामुळे सायबर विभागाने शुक्ला यांना दुसरे समन्स पाठवून ३नमे रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here