MPSC च्या पदसंख्येत वाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

123

‘एमपीएससी’च्या २०२२ मध्ये होणाऱ्या राज्य सेवा परीक्षांसाठीच्या ५०१ पदसंख्येत ६२३ पर्यंत वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने `एमपीएससी’च्या परीक्षांसाठी ५०१ पदे जाहीर केली होती. मात्र, या परीक्षेसाठी ११ संवर्गातील पदांसाठी मागणीपत्र प्राप्त झाले नव्हते. अपुऱ्या पदांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. त्याची दखल घेऊन पदसंख्येत वाढ करण्याची मागणी करणारे निवेदन भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २४ सप्टेंबर रोजी दिले होते. त्याचबरोबर याचा शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले असून, राज्य सरकारने ५०१ पदांवरून ६२३ पदसंख्या करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दुसऱ्यांदा पोलीस चौकशी)

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गानंतर विद्यार्थ्यांचा दोन वर्षांहून अधिक काळ वाया गेला. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पुढील वर्षापासून वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी सुद्धा विद्यार्थ्यांकडून राज्य सरकारकडे केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.