राज्यभरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सुमारे २ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे सरकार कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांना यानिमित्ताने मोठी संधी मिळणार आहे.
सरकारी सेवांचे आऊटसोर्सिंग
महाविकास आघाडी सरकारने आर्थिक बचतीसाठी ही सर्व रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे २० ते ३० टक्के सरकारी खर्चात बचत होणार आहे. मात्र सरकारी कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. मात्र तरीही सरकार खर्च आटोक्यात आणण्यासाठी सरकारी सेवांचे आऊटसोर्सिंग करणार आहे.
(हेही वाचा पवार आणि राष्ट्रपती राजवटीचं ‘हे’ आहे जूनं ‘कनेक्शन’, महाराष्ट्रात त्याचं पुन्हा होणार ‘दर्शन’?)
कोणती पदे भरणार?
या सरकार भरतीत मंत्रालयीन विभागातील लिपीक, टंकलेखक, स्वीय सहाय्यक, लघु टंकलेखक, सर्व कार्यालयांमधील कनिष्ठ लेखापाल अशी पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील १०० टक्के पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता, मात्र आता ही पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community