एसटीच्या संपावर शोधला रामबाण उपाय! जाणून घ्या कोणता?

126

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील अडीच महिने संप सुरु केला आहे. त्यामुळे महामंडळाचे ६०० कोटीहुन अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी अखेर राज्य सरकारने यावर रामबाण उपाय शोधला आहे. सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणार आहे. याची सुरुवात नागपूर विभागातून सुरु झाली आहे. एसटीच्या 135 निवृत्त कर्मचाऱ्यांची यादी तयार आहे.

घाबरून १३ संपकरी कर्मचारी झाले रुजू 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद असलेल्या बसगाड्यांचे स्टेअरिंग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी नागपूर विभागात 135 सेवानिवृत्त एसटीच्या चालकांची यादी तयार झाली आहे. निवृत्त एसटी चालकांना 20 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. नागपूर विभागात आतापर्यंत 20 एसटीच्या निवृत्त चालकांनी अर्ज केला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार आहेत. त्यामुळे नागपुरातील गणेशपेठ आगारात 13 संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

(हेही वाचा जर फेब्रुवारीत कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक, तर मार्चमधील बोर्डाच्या परीक्षांवर गडांतर?)

१२ जणांना बडतर्फ 

राज्य परिवहन महामंडळ (एसटी)चे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर जवळपास दोन महिन्यानंतरही कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे गुरुवारी आणखी 12 जणांना बडतर्फ केले आहे. विभागातील संपकर्त्यांपैकी 435 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 159 कर्मचार्‍यांना बडतर्फची नोटीस देण्यात आली होती. यात प्रामुख्याने 10 चालक, 4 वाहक व 1 यांत्रिकी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. गुरुवारी सर्वाधिक 25 बसेस धावल्या

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.