राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेले असून या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी कामबंदची हाक दिल्यामुळे आता राजपत्रित अधिकारी संघटनेबरोबर सरकारची चर्चा होणार आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता राज्याच्या मुख्य सचिवांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर राजपत्रित अधिकारी संघटनेने २८ मार्चपासून संपात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.
( हेही वाचा : केंद्र सरकार सतर्क! कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी)
बोर्डाच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता
सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन कामकाज ठप्प झाले आहे. तर दुसरीकडे दहावी-बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरू असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने बोर्डाच्या निकालाला यंदा विलंब होण्याची शक्यता आहे.
संपाचा सातवा दिवस
राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. या संपाचा हा सातवा दिवस आहे. २० मार्चला सर्व जिल्हा कर्मचारी कार्यालये, शाळेसमोर दुपारी १२ ते साडे बारा या वेळेमध्ये गगनभेदी थाळी नाद करून राज्य सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा धिक्कार करण्यात येणार आहे अशी माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community